ऑफिस मध्ये टाईमपास मधून वेळ काढून काम करताना नेट वर बरेच ब्लॉग्स वाचले; काही अगदी मनापासून आवडले.
आपण सुध्धा काहीतरी लिहाव अस बऱ्याच दिवसापासून मनात होत, पण काही केल्या मुहूर्त लागत नव्हता, आणि लिहायच ते कशासाठी? आणि समजा लिहिलच काही तरी ते public कशासाठी करायच हा प्रश्न होताच.
इंजिनीरिंग झाल्यावर एक-दोन वर्षे 'सो-कॉल्ड' "कोअर फिल्ड" मध्ये धड्पडल्या नंतर हातात काहीच पडत नव्हतं (अगदी शब्दश:); मग काय? घरातल्यांच्या सांगण्यावरून स्वताच्या सगळ्या भन्नाट भन्नाट 'आयडिया' गुंडाळून ठेवल्या आणि शहाण्याबाळासारखा गपगुमान 'आय. टि. त' भारती झालो.
सुरवातीला पुण्यात आल्यावर एकदमच वेगळं वाटायला लागल होत, केमिकल factory त दिवसभर घाम गाळायची सवय असल्यामुळं ए.सी. मधल्या sofisticated वातावरणात मळमळल्यासारख व्हायचं..... वाटायचं आपल्यासारख्या कोल्हापूरच्या मोकळ्या ढाकळ्या माणसाला हे आसलं जमल का? उगिचच बिचकल्यासारखं व्हायचं...
पण आज २-३ वर्षे पार पडल्यानंतर बऱ्यापैकी रुळलो आहे. फावल्या वेळात ऑफिसच काम चोखपणे पार पडतो आहे. बऱ्यापैकी इंग्लिश आणि थोडफार हिंग्लिश सुध्धा बोलायला शिकलो आहे,
पण आजसुद्धा जीन्स आणि टिshirt जरी सर्रास वापरत असलो तरी मिशीला कात्री लावावीशी वाटत नाही आणि सातारा रोडवर flat शोधत असलो तरी; कायमच इथच सेटल व्हायला मन तयार होत नाही.
कोल्हापूरपासून शरीरान जसा दुरावलो तसा मनांन मात्र फारच जवळ जायला लागलो. आजही करवीर नगर वाचन मंदिरात किंवा कापिलतीर्थातल्या भास्करराव जाधव वाचनालयात जायला जमत नसलं तरी ऑफिसात न चुकता 'सकाळ' आणि 'पुढारी'ची कोल्हापूर आवृत्ती दररोज इमाने इतबारे वाचतो.
आपल्या गावाच्या काही बातम्या वाचताना "कोल्हापूरकर" असल्याचा अभिमान वाटतो तसच काही बातम्या वाचताना मन अगदी खट्टू होतं. गप्पांच्या फडात जरा कुठ संधी मिळाली कि कोल्हापूर बद्दलच्या चार गोष्टी हक्कान आणि स्वाभिमानान सांगतो. पण आज-काल पोर बोअर व्हायला लागली आहेत, म्हणूनच आपला हक्काचा audiance मिळवण्यासाठी आणि आपल्या कोल्हापूर विषयी ज्यांच्या मनात प्रेम आहे त्यांच्या बरोबर हितगुज करण्यासाठी हा सगळा उपद्व्याप.
कोल्हापूरच्या आणि माझ्या आजू-बाजूला घडणाऱ्या गोष्टी मांडण्यासाठी "अस्सल-कोल्हापुरी" नजरेतून.
Jordar aani Dhadakebaj re mitra
ReplyDeleteMitra asech lihit ja khup mast lhitaos reeeee.............
ReplyDeletekhup bare vatale re vachun ..........
khalas ...............katakirrrrrrrrrr
jagavar.........palti